नंदूरबार l प्रतिनिधी
एप्रिल फुल च्या निमित्याने शिंदखेडा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील शिवाजी चौकात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आज एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाचा वाढदिवस असल्यामुळे अवघ्या देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली आहे यावेळी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. हा वाढदिवस म्हणजे जनतेसाठी एप्रिल फुल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यानिमित्त केकही कापला.पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , शेतकर्यांची,जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवर आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन कारण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी सभापती विठ्ठलसिंग आण्णा गिरासे, आधार पाटील, तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, जि.प.सदस्य ललित वारूडे, युवक कार्याध्यक्ष निखिल पाटील, दिपक गिरासे, देवीदास मोरे, ऍड निलेश देसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, दुर्गेश पाटील, संदीप थोरात कमलाकर बागले, युवक शहराध्यक्ष गोलु देसले, युवक दोंडाईचा शहराध्यक्ष राहुल सोनवणे दयाराम कुंवर, प्रदीप बागल, किरण पाटील,गणेश पाटील, युवक कार्याध्यक्ष बापुजी मिस्त्री, ग्रंथालय गणेश पाटील सेलचे हर्षदीप वेंदे, योगेश पाटील, ओ बी सी सेलचे भुषण माळी, युवक जिल्हासंघटक योगेश पाटील रवी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.