नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील गुजर गल्लीत वीज बील भरण्यास सांगितले असता याचा राग आल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ विजय इंदास पाटील यांनी शहादा शहरातील गुजर गल्लीत राहणारे मणिलाल बन्सीलाल पाटील यांना वीज बील भरण्यास सांगितले . याचा राग आल्याने मणिलाल बन्सीलाल पाटील , तिलक मणिलाल पाटील व हिमालय पाटील यांनी विजय पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली . तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला . याबाबत विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३५३ , ३२३ , ५०४ , १८६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपस सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप अराक करीत आहेत .