नंदुरबार | प्रतिनिधी
बाजार समितीच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ द्या असे आवाहन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे झालेल्या मेळाव्या प्रसंगी केले.
नंदुरबार कृषि बाजार समिती निवडणुकी संदर्भात पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली निलेश लॉन येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला खा. डॉ.हिना गावित, भिका पाटील, महेंद्र पाटील, रवींद्र गिरासे, शेखर पाटील, मुन्ना पाटील, शरद तांबोळी, शांताराम पाटील, सागर तांबोळी, लहू पाटील, प्रकाश गावित, वसंत पाटील, दगा कोळी व सरपंच व विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगीतले की, नंदुरबार बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात आपण बैठक घेत असून शेतकर्यांना हक्काच्या बाजार समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीत इच्छुक उमेदवारांनी आपले कागदपत्र तयार करून ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.पुढे डॉ.गावित म्हणाले की,जिल्ह्यातील बाजार समिती आपल्या ताब्यात आल्या तर आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीच्या हात मिळेल व बाजार समितीचा विकास व शेतकर्याचा चौरंगी विकासासाठी मदत होईल असे सांगत.
मागील काळात दुखावलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आपण ही निवडणूक लढवून बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.यावेळी शेतकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून पुढील दोन दिवसात बैठक घेऊन अडीअडचणीच्या निवारा करण्यात येणारच असल्याची माहिती डॉ.गावित यांनी दिली.गाव पातळीवर बैठका बोलून विचार करून पुढील रणनीती ठरवण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मार्केट कमिटीच्या निवडणुकीत पॅनल विजय झाल्यास शेतकर्यांना हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगते मार्केट कमिटीचा विकास करण्यासाठी आपली साथ हवी असे त्यांनी सांगीतलेे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गिरासे यांनी केले यावेळी सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खा.हिना गावीत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.








