Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा बाजार समितीच्या निवडणुकीचे दीपक पाटील यांनी फुंकले रणशिंग

team by team
March 27, 2023
in राजकीय
0
शहादा बाजार समितीच्या निवडणुकीचे दीपक पाटील यांनी फुंकले रणशिंग
शहादा l प्रतिनिधी
   कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या संचालक मंडळ निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही गटाची कार्यकर्त्यांसह विचार विनिमय करण्यासाठी परिसराचे नेते दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.रविवारी सरदार पटेल सभागृहात झालेल्या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या संचालक मंडळ निवडणुकी निमित्ताने रविवार दि. 26 रोजी झालेल्या बैठकीस परिसराचे नेते, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष  दीपक पाटील, शहादा-तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी, शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधवकाका पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  सुनील पाटील, युवा नेते मयूर दीपक पाटील यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी बैठकीस प्रमुख उपस्थित होते.
    यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, व्यापारी, हमाल-मापारी, विविध संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा संचालक मंडळ निवडणूक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध व्हावी असा सूर उपस्थित सदस्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आ. राजेश पाडवी यांनी तसेच दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी प्रकाशचंद्र जैन,अनिल भामरे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक किशोर मोरे यांनी केले. आभार माजी उपसभापती रवींद्र रावल यांनी व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Next Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 5 हजार 755 शेतकऱ्यांना मिळाला 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ

Next Post
शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 5 हजार 755 शेतकऱ्यांना मिळाला 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 5 हजार 755 शेतकऱ्यांना मिळाला 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add