Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

team by team
March 27, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

नंदुरबार | प्रतिनिधी

 

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वावद येथील संतोष वसंत पाडवी (वय २६) हे दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एएच ७९०२) मेहूल सुाभष पाडवी (वय २३) यांना बसवून नंदुरबार ते तळोदा रस्त्याने आडची येथे जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.४२/३५५०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून करजकुपा गावाजवळ दुचाकीच्या हॅण्डलला कट भारला. यावेळी मेहूल सुभाष पाडी यांनी दुचाकीवरुन उडी मारली. तर संतोष वसंत पाडवी हा दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. संतोष पाडवी यांना रिक्षातून उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत मेहूल पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.

 

 

 

 

तसेच सोनपाल बाबुराम पाल (वय ३५, रा.देहलीया ता.सवाजपूर जि.हरदोई उत्तरप्रदेश) हे दुचाकीने (क्र.यु.पी. ३० बीजी ६३३१) बडवाडी गावाहून अक्कलकुवा येथे उधारीचे पैसे घेण्यासाठी शहादाकडून प्रकाशाकडे जात होते. यावेळी लक्ष्मण संतोष दहिहंडे (रा.रावेर चितोड रोड, धुळे) याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.सी.जी. १० एएफ ५१६८) डामरखेडा गावाजवळील रस्त्यावर अचानक डाव्या बाजूला ट्रक थांबविल्याने सोनपाल पाल हे दुचाकीसह मागून ट्रकवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

 

 

 

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत अनकपाल बाबुराम पाल यांचिया फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात ट्रकचालक लक्ष्मण दहिहंडे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

 

 

 

 

तर अक्कलकुवा तालुक्यातील विरपूर येथील मनुसिंग रतन पाडवी हे दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ टी २८०८) पुतणे नागेश तडवी याला सोबत विरपूर ते वाण्याविहिर रस्त्याने अक्कलकुवा येथे सिलेंडर भरण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यावर अचनाक खडी आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात मनुसिंग रतन पाडवी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर नागेश पाडवी यालाही गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मयत मनुसिंग पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव येथे पार पडली अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

शहादा बाजार समितीच्या निवडणुकीचे दीपक पाटील यांनी फुंकले रणशिंग

Next Post
शहादा बाजार समितीच्या निवडणुकीचे दीपक पाटील यांनी फुंकले रणशिंग

शहादा बाजार समितीच्या निवडणुकीचे दीपक पाटील यांनी फुंकले रणशिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add