तळोदा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सुसरी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या शहादा आगमनाप्रसंगी त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य तथा माजी आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान या भेटीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सुसरी धरण प्रश्न संदर्भात निवेदन देऊन लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती उदेसिंग पाडवी यांनी केली.
यावेळी ओबीसी प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रामराव आघाडे, जेष्ठ कार्यकर्ते केसरसिंग क्षत्रिय, नज्जू खाटीक, डॉ.तुषार संनसे, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, कृ.उ.बा.समितीचे संचालक तळोदा भरत चौधरी, युवा कार्यकर्ता संदीप परदेशी, माजी नगरसेवक गणेश पाडवी, भट्या पाडवी, महेंद्र पोटे, राहुल पाडवी, गणेश राणे, बिलाल मिया जागिरदार, धर्मराज पवार, संदीप वळवी आदी उपस्थित होते.