नंदुरबार l प्रतिनिधी
चिनोदा : तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या हिंदू समाजाच्या रूढी परपंरेनुसार नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा होय.
आपल्या ह्या नवीन वर्षापासून सर्व शुभ कार्यास सुरुवात होते. तसेच तळोदासाठी येणारे नववर्ष आनंदी जावो तसेच अवकाळी पाऊस, कोरोना सारख्या कोणताही आजार येत्या वर्षात पसरू नये सर्व धर्म गुण्यागोविंदाने नांदो ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे मोठ्या उत्साहाने कार्यालय सजविण्यात आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष योगेश मराठे यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरोहित हरीश जोशी महाराज यांच्याकडून विधिवत पूजन करत हनुमान चालीसा पठन करून गुढी उभारण्यात आली होती.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, मा.कृ.उ.बा.स.स.प्रल्हाद फोके, माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, सरचिटणीस महेंद्र पोटे, माजी नगरसेवक गणेश पाडवी, सरपंच दीपक वळवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, हितेश चौधरी, वैभव कर्णकार, हितेश राणे, वैभव मगरे, सदाशिव ठाकरे, मोहन कोळी, सुशील सुर्यवंशी, आकाश पाडवी, सुदाम टेलर, दिलीप नाईक, कुशन वळवी, सकेल नाईक, प्रकाश पाडवी, इमरान शिकलीकर, नितिन मराठे आदी उपस्थित होते.