नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सावाचे औचित्य साधून माळीवाडा परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, मनोज माळी, डॉ.अनिल माळी, मातृवंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र माळी, उपाध्यक्ष राहुल माळी, सचिव जगदीश वंजारी, कार्याध्यक्ष हेमंत माळी, योगेश माळी, रोहित जैन, विशाल माळी, नवीन माळी आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक एन.जी.भावसार म्हणाले, की गेल्या दिड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे जिकरीचे झाले होते. अशा काळात मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. याबद्दल त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमास निंबा माळी, विजय माळी, सिद्धांत माळी, प्रसाद माळी, पी.पी.सोनवणे, डी.ए.भामरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.