नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग , प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार , बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने त्याचा प्रभाव म्हणून जिल्ह्यात २० ते २३ सप्टेंबर दरम्यान विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे . शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्याने पक्कता अवस्थेत असलेल्या मुग , उडीद , फळ आणि भाजीपाला इत्यादी पिकांची पिकांची काढणी करून पावसाने भिजणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावे . या कालावधीत पिकांना खते देणे , फवारणीची कामे करणे , पाणी देणे टाळावीत . शेतात पाणी साचून राहिल्याने रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतात पाणी राहणार नाही यासाठी निचरा करून देण्याची व्यवस्था करावी . विजांचा कडकडाट होत असताना तुमच्या भागात विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी मोबाईलच्या प्ले स्टोरमधून ” दामिनी ” ॲप डाऊनलोड करावे .असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र , डॉ . हेडगेवार सेवा समिती , कृषि विज्ञान केंद्र , नंदुरबार तर्फे करण्यात आले आहे.