म्हसावद l प्रतिनिधी
कोरोना काळात उभारी घेतलेल्या आदिवासी संगीत क्षेत्राने,अनेक मोठं मोठे रेकॉर्ड केलेले आहे त्यात ‘चिंगम’ गाण्यापाठोपाठ ‘आदिवासी जंगल रखवाला रे’ अशी अनेक गाणे दर्शकांचा कोटींचा आकडा पार करत असतांना
चार पाच महिन्यांपूर्वी आदिवासी समाजात पसरत चाललेली व्यसनाधीनता तरुणांचा टोळ्या ह्या गंभीर विषयावर आपली लेखणी फिरवत ॲड.सुभाष वळवी ह्यांनी जादू फिरवला गाणे तयार झाले खरे पण प्रेमी गाण्याचा दुनियेत गाणे दर्शकांना आवडेल का? हा मोठा प्रश्न डोळ्यादेखत असतांना सुद्धा सामाजिक भान पुढे ठेवत व्यसनमुक्तीवर आधारित खास विषय पुढे घेत ‘डांबऱ्या’ हे नाव पुढे घेत गीतांचे निर्माण झाले.
जे मूळ देहवाली बोलीत आहे आणि ज्या गाण्याचे लिखाणकाम,दिग्दर्शक,निर्माता म्हणून स्वतः ॲड सुभाष वळवी यांनी काम पाहिलेले आहे. गाण्यातील सुंदर नजारा हा धडगाव तालुक्यातील हुंडा-रोषमाळ येथील आहे,जो प्रत्येकाचा मनाला भुरळ पाडणारा आहे.
या गीतात मुख्य कलाकारांचा रूपाने गुजरात मधील प्रसिद्ध चेहरे सरू वसावा आणि तरूण वसावा ह्यांनी काम केलेले आहे बाकी सहयोगी कलाकार म्हणून हुंडा-रोषमाळ येथील ग्रामस्थांचा सोनेरी सहभाग हा तेवढाच आकर्षक ठरला आहे.गीताचा चित्रिकरणाप्रसंगी नर्मदा विकास बहूउद्देशीय संस्थचे संस्थापक अध्यक्ष प्रा बाबुलाल पावरा यांचे सहकार्य फार मोलाचे ठरले आहे.