म्हसावद l प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत चे निवेदन महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना ATS आदिवासी टायगर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट असता त्यांना आदिवासी टायगर सेना ATS चे नंदुरबार तालुका सचिव अजय पवार व कार्यकर्तेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या भावना समजुन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा .
गेल्या चार ते पाच वर्षापासुन शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाच्या फटका बसत आहे. यावर शेतकरी बांधव व हे अवकाळी पावसाच्या नुकसानाने कर्ज बाजारी तसेच स्थलांतर होण्याचे दिवस आलेले आहेत.
शेतात कांदे,लसुण,भुईमुंग, गहु,हरभरा,इ. अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी आपण प्रशासनाच्या माध्यमातुन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करुन शेतात झालेल्या खर्चांचे मोबदला मिळवुन द्यावा जेणेकरुन शेतकरी राजा हा अवकाळी पावसाच्या संकटातुन शेतकरीला दिलासा द्यावा. शेतकरी वर पाऊस गारपीटाचे संकट आलेले आहे यावर आपणास महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडुन आदिवासी टायगर सेना ATS च्या माध्यमातुन देण्यात आले.शेतकरी राजाच्या भावना समजुन तात्काळ शेतकरीला न्याय द्यावा.असे निवेदनात म्हटले आहे.