नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील मंगळ बाजार परिसरातील साई किराणा भंडारतर्फे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गहु महोत्सवास शुभारंभ करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी सदिच्छा भेट दिली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष प्रारंभ होत असते.गेल्या 75 वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या साई किराणा भंडारचेे संचालक महेंद्र चौधरी यांनी डॉ. अभिजीत मोरे यांचे स्वागत केले.याप्रसंगी सागर चौधरी, चंद्रशेखर चौधरी,निलेश चौधरी, महेश सितपाल,दगा चौधरी आदी उपस्थित होते.