नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने गुढी संकल्पाची,गुढी परिवर्तनाची,गुढी समतेची,गुढीअखंडतेची,गुढी राष्ट्रवादाची उभारण्यात आली.
गुढी राष्ट्रवादीची गुढी पाडवा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव ॲड. राऊ मोरे यांच्या हस्ते नंदुरबार येथील जुनी नगर पालिके शेजारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ गुढी उभारण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा सचिव नितीन जगताप,माधव मामा पाटील, शहराध्यक्ष मोहन माळी, कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, जिल्हा सदस्य जितेंद्र खंडवे, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे,ओबीसी सेल जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, जितेंद्र ठाकरे, राजा ठाकरे , धनराज बच्छाव युवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.