नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरात दोन व अक्कलकुवा येथे एक अशा तिघांविरोधात वीज चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर शहरातील गुजर गल्लीतील मगनभाई लल्लूभाई पांचाळ यांच्या येथील वीज वापरदार अमित नवनीतभाई पांचाळ याने वीज वितरणची अनाधिकृतपणे १ लाख ८४ हजार ५८४ रुपये किंमतीची ९३४५ युनिटची वीज चोरी केली.
तसेच अजयकुमार मगनलाल पांचाळ यानेही ३ लाख १७ हजार ४९४ रुपये किंमतीची १६२३५ युनिटची वीज चोरी केली. अक्कलकुवा शहरातील मारवाडी गल्ली येथील गौतमचंद अमरचंद जैन याने ९२ हजार ६१० रुपये किंमतीची वीज केल्याचे आढळून आले.
याबाबत महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन संबंधित पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.