नंदूरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा अंतर्गत १०० रुपयात प्रत्येकी १ कि.ग्रॅ. रवा, साखर, चणाडाळ व १ लिटर पामतेल किट वाटपाला काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरूवात करण्यात आली.
नवापुर शहरातील तीनटेंबा भागातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाच्या वतीने नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित व भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा अंतर्गत किट वाटप करण्यात आली. याप्रसंगी नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, पुरवठा निरीक्षक खैरनार, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, हेमंत जाधव, भाजपा शहर अध्यक्ष प्रणव सोनार, शहर सरचिटणीस अजय गावित, जैनू गावित, सौरव भामरे, हेमंत शर्मा, गोपी सैन, रसूल पठाण आदींसह स्थानिक लाभार्थी उपस्थित होते.