नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सात दिवसांपासून संपावर आहेत. आज अखेर हा संप मिटला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.








