नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशा येथे सुरू असणाऱ्या जिल्हा वार्षिक प्रेरणा मेळाव्यात नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणी गठित करण्यात आल्या.दरम्यान, दोन दिवसीय या प्रेरणा मेळाव्याच्या समारोप आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या दोन दिवसीय संयुक्त वार्षिक प्रेरणा मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.आज दुसऱ्या दिवशी या प्रेरणा मेळाव्यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात विविध वैज्ञानिक चमत्कारांचे प्रशिक्षण उपस्थित कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे राज्य कार्यवाह परेश शहा राज्य सरचिटणीस विनायक सावळे,कीर्तीवर्धन तायडे,सुरेश बोरसे,आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा नूतन कार्यकारणी गठित करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसच्या पुढील दोन वर्षासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून हैदरअली नुरानी यांनी सर्वानुमते पुनर्निवड करण्यात आली.जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी. बी. शेंडे,डॉ सी. डी. महाजन, यांची जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील,जिल्हा प्रधान सचिव वसंत वळवी यांची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारणीत विविध उपक्रम कार्यवाह मुकेश कापुरे,प्रशिक्षण विभाग कार्यवाह हंसराज महाले,बुवाबाजी संघर्ष कार्यवाह प्रदीप केदारे,मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग कार्यवाह फिरोज खान, जातीअंत संकल्प विभाग प्रा. डॉ. प्रशांत बोबडे, महिला सहभाग विभाग सुमित्रा वसावे,युवा सहभाग विभाग भारती पवार,
निधी संकलन विभाग प्रवीण सावळे, यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात महाराष्ट्र अनिसचे कामकाजाची नंदुरबार जिल्ह्यातील दिशा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या स्वतंत्र गटचर्चा घेण्यात येऊन त्याचा आढावा बैठकीत मांडण्यात आला.
या वार्षिक प्रेरणा मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शहादा अनिस शाखेचे कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
समविचारी कार्यकर्त्याची हितगुज
महाराष्ट्र अनिस धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या संयुक्त वार्षिक प्रेरणा मेळाव्याच्या समारोप सत्रापूर्वी जिल्हातील पुरोगामी परिवर्तनवादी व समविचारी कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात येऊन त्यांच्या सोबत हितगुज साधण्यात आले. या सत्राला शहादा येथील आदर्श प्रतिष्ठानचे डॉ शशांक कुलकर्णी,जनार्थ संस्थेच्या रंजना कान्हेरे विक्रम कान्हेरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.जयसिंग माळी,विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार, सामाजिक कार्यकर्ते व नर्मदा बचाव जनआंदोलनाचे प्रा जयपाल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील,सुवर्णा सोलंकी, नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ प्रसाद सोनार,आदी उपस्थित होते या सत्राच्या अध्यक्षस्थानी अनिसचे नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे होते.या मेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र अनिस कामकाजाबद्दल अपेक्षा व त्यांच्या साथ सहयोग याबाबत संवाद साधला.








