नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे दि.19 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून, नंदुरबार जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 100 टक्के प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते, बैठकीत सर्व कर्मचारी बंधू- भगिनी यांना आवाहन करण्यात आले आहे की, संपाची दाहकता वाढवण्यासाठी राज्याच्या नियोजनानुसार दि. 20 मार्च 2023 सोमवारपासून
पंचायत समिती कार्यालय येथे थाळीनाद आंदोलन, ढोल बजाओ आंदोलन, बाईक रॅली आंदोलन, मुंडण आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय, नवापूर, नंदुरबार, शहादा,धडगाव, अक्कलकुवा, तळोदा येथे सर्व शाळा आणि शासकीय कार्यालये उद्यापासून 100 टक्के बंद करून सर्व सक्रिय राहणार आहेत,
एकच मिशन जुनी पेन्शन “जुनी पेन्शन” मागणीसाठी सुरू केलेल्या संपात राज्यातील लक्षावधी कर्मचारी, शिक्षक उतरले आहेत, शासनाच्या धमक्यांना, नोटीसला न घाबरता हिमतीने पुढे जात आहे. आरोग्य सारख्या अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नर्सेस, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, सफाई कामगार हे संपात सर्वात पुढे आहेत, अभी नही तो कभी नही लक्षात ठेवून संपात सक्रिय झाले आहेत.








