नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दि .१८ रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे .
आज दि .१८ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शहादा येथे श्री . पी . के . अण्णापाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन नमन व वंदन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत . सोईनुसार मोटारीने शिरपूर , ता . शिरपूर , जि . धुळेकडे प्रयाण करणार आहेत , अशी माहिती विजय चौधरी यांनी दिली आहे .