नंदुरबार l प्रतिनिधी –
हातोडा- तळोदा पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासुन प्रलंबीत होती.आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे नगर विकास विभागाने केंद्र शासनाच्या राज्य जलकृती आराखडा तळोदा नगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या समावेश करून१७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिल्याने तापी पाणीपुरवठेचा लाभ तळोदेकर जनतेला होणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २० अभियान अंतर्गत तळोदा शहराला पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी शासनाने २९ कोटी ५० लक्ष रुपयांची मान्यता नगर विकास विभागाने दिलेली आहे. त्यामुळे २००७ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली हातोडा तापी पाणीपुरवठा योजना पूर्णतत्त्वास येण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे.सन २००९ साली तापी नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी रुपयाच्या निधी दिला होता.
त्यातून जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले होते.आ.राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी आम्ही गुजरात सरकार महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाणीपुरवठा योजना पूर्ण तत्त्वास येण्यासाठी पाठपुरावा केलेला असून नगर विकास विभागाने केंद्र शासनाच्या राज्य जलकृती आराखडा तळोदा नगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या समावेश करून त्या १७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली असून तापी नदीतून पाणी उचलण्यासाठी जेकवेल व्यवस्था करणे, पाईपलाईन टाकणे, वीज पुरवठा जलशुद्धीकरण करणे, आदि कामांचा समावेश करण्यात आला आहे.लवकरच सदर कामाला सुरुवात होऊन तापी पाणीपुरवठेचा लाभ तळोदेकर जनतेला होणार आहे.