नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तलावडी गावाच्यापुढे दुचाकींच्या झालेल्या धडकेत दोघांना दुखापत झाली असून एका दुचाकी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील दिनेश जहागीर पावरा व दादला बोंडा पावरा हे दुचाकीने तलावडी गावाच्या रस्त्याने जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.३९ एक्स ६४४०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात दिनेश पावरा व दादा पावरा यांना दुखापत झाली आहे. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत दिनेश पावरा यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र जाधव करीत आहेत.








