नवापूर l प्रतिनिधी
श्री राम जन्मोत्सव निमित्त श्री राम जन्मोत्सव समिती तर्फे रक्तदान शिबीर,विविध सांस्कृतिक देखावे महिलांची मोटरसायकल रेली,तसेच प्रभू रामचंद्राचा वेशभूषेतील १०१ युवक सहभागी होणार असून या भव्य श्री.राम जन्मोत्सवात मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा श्री राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भरत गावित यांनी उत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले.
श्री.राम जन्मोत्सव निमित्त शहरातील सरदार चौकात उत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समिती उपाध्यक्ष शंकर दर्जी, आबा मोरे,माजी नगराध्यक्ष गिरीश गावित,उद्योजक रमेशचंद्र अग्रवाल,अग्रवाल समाज अध्यक्ष जयंतीलाल अग्रवाल,मनोज अग्रवाल,राजेंद्र गावित,धाकू मोरे,माजी उपनगराध्यक्षा सौ ज्योती जयस्वाल सौ मीतू शर्मा,सौ.क्षमा देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना भरत गावित म्हणाले की, श्री राम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून सहकार्य करणे अधिक गरजेचे आहे.दि २६ रविवारी टाउन होल मध्ये भव्य रक्तदान शिबीर होणार आहे या शिबिरात १ हजार एक रक्तदात्यांचा सहभाग करून घेण्याचा संकल्प आहे.दि २९ बुधवारी सायंकाळी ५ वाजता महिलांची मोटरसायकल रेली, सायंकाळी ७ वाजता सुंदरकांड,दि ३० गुरुवारी श्री.राम जन्मोत्सवाच्या आधी ११:४५ वाजता शहरातील सर्व ब्राह्मण वृंदाच्या उपस्थितीत श्री.रामरक्षा पठण करून १२:०० वाजता महाआरती होईल.
श्री राम जन्मोत्सवात भव्य शोभा यात्रेत विविध सांस्कृतिक देखावे,लेझीम पथक विविध वाद्य पथक व १०१ श्री रामाच्या वेष भूशेतील युवक सहभागी होणार आहेत.या भव्य दिव्य श्री.राम जन्मोत्सवात शहरातील सामाजिक शिक्षणिक,धार्मिक विविध राजकीय क्षेत्रातील,तसेच सर्व समाजातील बंधू भगिनी,व्यापारी,युवकानी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन भरत गावित यांनी केले यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी बंधू भगिनी युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रास्ताविक किरण टीभे सूत्रसंचलन कमलेश पाटील तर आभार राजेंद्र गावित यांनी मानले.