नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात 16 मार्च 2023 रोजी रात्री 9: 34 मिनिटांनी बोलण्याची संधी मिळाली असता मतदारसंघातील तसेच आदिवासी समाजातील अनेक महत्त्वाच्या मागण्या सभागृहात मांडल्यात. यामूळे मतदारसंघातील विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे महाराष्ट्रभरात सुरू असलेले आश्रम शाळा व वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी स्वतंत्र ग्रंथालय व वाचनालय उभारली केली पाहिजेत.
प्रकल्प स्तरावरील विभागीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा, यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी असून त्यांना प्रशिक्षण देणारे क्रीडाशिक्षक कंत्राटी पद्धतीने मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुण ओळखून त्यांना प्रशिक्षित करीत आहेत.अशा क्रीडा शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत रुजू केले पाहिजे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातून मोठ्या प्रमाणावर आठ महिन्याहून अधिक काळ रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर होत असते.स्थलांतर थांबवण्यासाठी विकास निधी थांबून त्या ठिकाणी संपूर्ण निधी जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी व रोजगार निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले पाहिजे.
भगवान बिरसा मुंडा रस्ता जोड योजना सुरू केल्याबद्दल मूख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आभार व्यक्त केले.