म्हसावद l प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी तीन दिवसापासून आंदोलनावर ठाम आहेत.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झालेत. नंदुरबार जिल्ह्यात संपामुळे काही शाळा बंद ठेऊन मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही शाळा सकाळी भरल्या पण तिथे शिक्षकच आलेले नाहीत. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम रूग्णसेवेवर होताना दिसत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळी फीत लावून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.दरम्यान कालच्या मोर्चात सुमारे आठ हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
नंदुरबार जिल्ह्यात राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार यांच्या सोबत मोर्च्याच्या आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या संख्येने आज सर्व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश केला.
एकच मिशन जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती नंदुरबार यांनी जूनी पेन्शन करीता आज शुक्रवारी दि .17 मार्च 2023 रोजी सकाळी 9:00 वा. वाजता मोर्चाचे आयोजन केले होते. सदर मोर्चा हा शिस्तबध्द व शांततेच्या मार्गाने घेण्यात आला. सदर मोर्चा जुने पोलीस कवायत मैदान ( नेहरु पुतळा ) – गांधी पुतळा, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट,जळका बाजार, नवापूर चौफुली व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार असा घेण्यात आला.

शेवटी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्या नंतर जिल्हाधिकारी महोदय यांना समन्वय समिती मार्फत निवेदन देण्यात आले.
मोर्चाला मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत देवकर, संदीप रायते जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन, सुरेश भावसार, दादाभाई पिंपळे, गजानन नागरे लिपिक संघटना आदींनी संबोधित होते या नंतर जो पर्यंत शासन पेन्शसन लागू करणार नाही तो पर्यंत आपण सर्वांनी आपल्या तालुका पंचायात समिती समोर धरणे द्यावयाचे आहे.अशा सूचना देवजन समारोप करण्यात आला. सदर मोर्चात जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने सर्वच विभागातील् कर्मचारी व सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.

जो पर्यंत पेन्शन मिळणार नाही तो पर्यंत सदर बेमुदत संपातून कर्मचारी वर्ग माघार घेणार नाहीत.
आणि 28 तारखेपासून राजपत्रित अधिकारी देखिल या संपात सहभागी होऊन सदर संपाची ताकद वाढवणार आहेतअशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी दिली.








