नंदूरबार l प्रतिनिधी
दि.14 मार्च पासुन महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी संप पुकारलेला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, व शिक्षक संघटना समन्वय समिती, नंदुरबार यांनी जूनी पेन्शन या करीता दि.17 मार्च 2023 रोजी मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
सदर मोर्चा हा शांततेच्या मार्गाने फक्त पेन्शन मागणीच्या घोषणा देत निघणार आहे. सदर मोर्चा जुने पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, नवापूर चौफुली व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार असा असेल. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात येईल, असे अध्यक्ष व पदाधिकारी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्याकडून जाहिर करण्यात आले आहे.








