नंदुरबार l
येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिक्षिका धनश्री आजगे यांचा मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्री साई बहुद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त पुणे रुक्मिणी गलांडे, बाल न्याय मंडळ महाराष्ट्र शासन सदस्या शोभा पवार, ऍड.वंदना हाके (पुणे), अभिनेत्री तथा गायिका संज्योती देवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आहेर, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्षा पुष्पलता राठोड, समता परिषदेच्या शहराध्यक्षा आशा भुंदरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाार्या कर्तृत्ववान महिलांना मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मागील दहा वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी सांभाळून भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी धनश्री आजगे समाजकार्य करीत आहेत. व्याख्यानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ते कार्यरत आहेत. त्यांचे हे समाज कार्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यात सुरु आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मॉं साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आहेर आणि आभार प्रदर्शन अर्चना देवरे यांनी केले.