बोरद l प्रतिनिधी
दि.१३ मार्च रोजी संध्याकाळी ६.४५ मिनीटांनी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जोरजोरात वारे वाहू लागले त्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारांचा पाऊस मोड परिसरात बरसू लागला. याबाबत मोड येथील ग्रामस्थ गुलाबसींग गिरासे यांनी शहादा ,तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व पाऊसाबाबत कल्पना दिली.
याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी लागलीच संपर्क साधला.
या बाबत गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की तसेच तहसीलदार गिरीश वखारे त्याचप्रमाणे तळोदा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या समवेत तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे.त्या त्या त्या ठिकाणी तातडीने जाऊन संबंधित पिकाची पाहणी केली.
त्यात बोरद परिसरात असणाऱ्या मोड या गावी देखील पाहणी करण्यात आली.मोड येथील तलाठी राजेश पवार त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत दसपुते इत्यादी अधिकाऱ्यांनी मोड येथील उज्वला पाटील यांच्या मोड शिवारातील तसेच खरवड शिवारातील रमण वळवी यांच्या शेतात १३ मार्च रोजी झालेल्या वादळी पावसाने तसेच थोड्याफार प्रमाणात गारांच्या पावसाने गहू नेस्तनाबूत झाला याची प्रत्यक्ष पाणी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी झालेल्या नैसर्गिक आपत्ती बाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाला अनेक संकटांना संकटांना सामोरे जावे लागत आहे त्याबाबत दुःख ही व्यक्त केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पाठवा असे सांगितले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहादा तळोदा मतदार संघाचे प्रभारी नारायण ठाकरे तसेच मोड येथील सरपंच सविता गावीत, पुंडलिक राजपूत त्याचप्रमाणे जयसिंग माळी तसेच गुलाबसिंग राजपूत, अनिल राजपूत, किरण सूर्यवंशी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी सुभाष पाटील, विलास पाटील हे उपस्थित होते.