नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी येथे एस.टी.बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
स्वातंत्र्या नंतर प्रथमच बस सुरू झाल्याने गावातील नागरिकांनी आनंद वक्त केला आहे.बस सेवा सुरु झाल्यामुळे गावातील नागरिकांना अक्कलकुवा येथे येण्या जाण्यासाठी आ. आमश्या पाडवी यांनी सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचबरोबर कॉलेज व शाळे मध्ये जाण्यासाठी मुलांनसाठी सुद्धा सोय सुविधा उपलब्ध झाली आहे. आणि इतर कामांसाठी येण्या जाण्यासाठी सुद्धा सोय झाली असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहान आ. आमश्या पाडवी यांनी केलं आहे.
ही बस सेवा आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली आहे. यावेळी अधिकारी, बस चालक, कंडॉक्टर, आणि होराफळी या गावातील नागरिक आदी उपस्थित होते.