नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त असतांनाच दि. १० ते १३ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा गेल्या आठ महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. यानंतर सर्व व्यवहार देखील सुरळीत झाले. लग्नसमारंभासह मिरवणूका, विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात दि.१० ते १३ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत पाच कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबारातील चार तर शहाद्यातील एकाचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने सतर्कता गरजेचे
आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४४ हजार ५०५ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यातील ४३ हजार ५३८ जण बरे झाले असून ९६२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ लाख ४ हजार ४२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.