नंदुरबार l प्रतिनिधी
प्रहार शिक्षक संघटनेच्या सर्व तालुका कार्यकारिणीस तथा प्रहार शिक्षक संघटनेच्या विचारधारेशी संलग्न शिक्षकांना सुचित करण्यात येते की , महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे, सदर कालावधी २००५ नंतर रूजू झालेल्या सर्व नविन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या स्तरावर केली विविध माध्यमातून निवेदने , मोर्चा , आंदोलने राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आज पर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याचे निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे.
प्रहार शिक्षक संघटना ही कायम शिक्षक हितासाठी अग्रेसर असून आपल्या संघटनेचे बहुतांश सभासद हे २००५ नंतर सेवेत दाखल झालेले असल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हीच प्रहार शिक्षक संघटनेची भुमिका असल्याने राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या दि . १४ मार्च २०२३ पासून संपात महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटना १०० % सहभागी होत आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या सर्व स्तरावरील तालुकाध्यक्ष / तालुका सचिव यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती स्थानिक पदाधिका-यांशी समन्वय ठेवून संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे, राज्य संपर्कप्रमुख राहुल मोहोर, राज्य सचिव (जि. प.) वैजिनाथ सावंत, सचिव कृष्णा बोदेले, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई आदी पदाधिकारी यांनी केले आहे .