नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी व डॉ.विक्रांत मोरे मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा मिरवणूक देखावा स्पर्धा, तसेच रांगोळी स्पर्धा व किल्ले निर्मिती स्पर्धा यांचे माजी आमदार शिरीष चौधरी व डॉ.विक्रांत मोरे मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते. दि.१० मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील विविध मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी देखावा मिरवणूक काढण्यात आली होती, त्यात नंदुरबार शहरातील ब्रिगेड व्यायाम शाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, रोकडेश्वर व्यायाम शाळा, मारुती व्यायाम शाळा, सावता फुले मंडळ माळीवाडा मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, वीर भगतसिंग मित्र मंडळ, श्रीवीर भगतसिंग मित्र मंडळ, सोनार समाज मित्र मंडळ रॅली, नवजीवन व्यायाम शाळा मित्र मंडळ आदी शहरातील मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातून भव्य अशा देखावा मिरवणूक आयोजित केल्या होत्या,
त्यात भाग घेतलेला स्पर्धकांपैकी नंदुरबार शहरातील भव्य मिरवणूक देखावा स्पर्धांना माजी आमदार शिरीष मित्र मंडळतर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून सावता फुले मित्र मंडळाला २१ हजार रुपये बक्षीस जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात आले तर द्वितीय क्रमांक रोकडेश्वर व्यायाम शाळा मित्र मंडळाला माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, त्याचप्रमाणे माजी आमदार शिरीष चौधरी मित्र मंडळ व डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले निर्मिती स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचे देखील नंदुरबार शहरातील तैलिक समाज मंगल कार्यालयात बक्षीस वितरण कार्यक्रमात देण्यात आले, यावेळी कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.शिरीष चौधरी, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, नंदुरबार पालिकेचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नगरसेवक गौरव चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष वसईकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यावेळी उपस्थित होते,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक पवन भरत गवळी यांना ५००० रुपयाचे रोख बक्षीस सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, दुसर्या क्रमांकाचे बक्षीस संघ क्रमांक १७ श्रुती राम सूर्यवंशी व श्रेयस राम सूर्यवंशी यांना ३ हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले, तृतीय क्रमांकाचे बक्षीस संघ क्रमांक १६ मनोहर बापू लोहार, मीनाक्षी मनोहर लोहार, शांतीलाल मोतीलाल पाडवी, चेतन ताराचंद मराठे व नितेश शहा यांना रुपये पंधराशे रुपयेचे बक्षीस सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचप्रमाणे स्पर्धेत उत्तेजनार्थ व प्रोत्साहनपर देखील बक्षिसे हे संघ क्रमांक १५ संघ ४ संघ क्रमांक एक यांना देण्यात आले, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक संघ क्रमांक २१ राहुल नामदेव भामरे व महेंद्र राजाराम माळी यांना पाच हजार रुपयेचे रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, द्वितीय क्रमांक संघ क्रमांक १६ मयुरी सतीश गायकवाड तीन हजार रुपये रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,
तिसर्या क्रमांकाचे बक्षीस संघ क्रमांक ६६ गौरव शांताराम माळी यांना पंधराशे रुपये व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, नंदुरबार जिल्ह्यात अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत मोठ्या संख्येने जिल्ह्यातून स्पर्धकांचे सहभाग लाभला होता, विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले,यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, अशा स्पर्धा या आगामी काळात शासनाच्या योजनेतून राबविण्याचा संकल्प असून, लवकरच अशा स्पर्धा या शासन मान्यतेने भरविण्यात येतील जेणेकरून जास्तीत जास्त स्पर्धक यात सहभागी होतील आणि मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार,असे डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले, पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी केले.