नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.राजेश पाडवी यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना आधार देत पंचनामे करून घेतले.
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यासह शहादा, तळोदा मतदार संघातील वेगवेगळ्या गावात बेमोसमी व अवकाळी पाऊस झाला असून, शहादा तळोदा मतदारसंघातील आ. राजेश पाडवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा पूर्ण करत, काल पहाटे मतदार संघात परतले असून काल मतदारसंघातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले तळवे, मोड, खरवड, आमलाड, काजीपूर, तलावडी, बोरद, मोरवड आदी गावांना भेट देत, शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधला,
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे नुकसान भरपाई संदर्भात महसूल विभागातर्फे पंचनामे करून घेतले, “महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना सरकार व आमदार या नात्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासित करत, आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, यावेळी आ. राजेश पाडवी यांच्यासमवेत तळोदा माजी नगराध्यक्ष अजय परदेसी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, गौरव वाणी आणि सुभाष चौधरी, चेतन गोसावी, प्रवीण सिंग राजपूत, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, शेतशिवारातील शेतकरी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.








