नंदुरबार l
शहरातील घरकुल वसाहत येथील ॲग्लो ऊर्दु शाळेच्या जिन्याखाली ठेवलेले पाण्याच्या टाकीचे सुमारे सहा लाखाचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी १० संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील घरकुल वसाहतीत ॲग्लो ऊर्दू शाळेच्या जिन्याखाली ठेवलेले पाण्याच्या टाकीसाठी लागणारे साहित्य अमन आशिक तेली, साजिद पठाण रहिम पठाण, अफसराद्दीन नवाजोद्दीन काझी, अब्दुल सलाम अब्दुल लतीफा शेख, साबीर मोहंमद भिस्ती यांच्यासह पाच जणांनी पाईप लाईनचे ४२ नग, वॉल बेन्ड २ नग असे ६ लाख २४ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत मेघरान शिवप्पा बरपडे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १० संशयितांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.








