नंदूरबार l प्रतिनिधी
येथील के.बी.बांगड़ परिवार आणि श्री महेश सोशल वेलफेयर क्लबतर्फे सामुहिक विवाह सोहळा पार पडला. या सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
येथील गौरव पॅलेस येथे वरघोड़ा, वरात, फटाके, फेरे, वरमाला, स्टेज अश्या सर्व हिन्दू सांस्कृतिक व सनातन धर्मच्या रीतिरिवाज़ाप्रमाणे सामुहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी नवदाम्पत्याना बांगड़ परिवारा तर्फे संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरिष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी नवदांपत्यांना आशीर्वांद देताना चंद्रकांतजी रघुवंशी म्हणाले की, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने बांगड परिवाराने जो सर्व जाती समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले, हे अत्यंत गौरवास्पद आहे. विजयभाऊ चौधरी म्हणाले की, अशा पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा आजच्या काळाची गरज आहे. त्याबद्दल बांगड परिवार व श्री महेश सोशल वेल्फेअर क्लबचा हा स्तुत्य उपक्रम आहे. विवाह सोहळ्यासाठी महेश सोशल वेलफेयर क्लबचे सदस्य अशोक बांगड़, नवीन बिर्ला, श्यामसुंदर बांगड़, प्रशांत राठी, विजय सारड़ा, दिलीप मंत्री, किशोर झवर, सोमनाथ माहेश्वरी, शैलेश मोदानी, डॉ.उदय आगीवाल, प्रीतिश बांगड़, रवींद्र कालानी, श्याम लाहोटी, नंदुरबार जिल्हा माहेश्वरी महासभा, माहेश्वरी प्रगती मंडळ, माहेश्वरी पंच मंडळ, माहेश्वरी जिल्हा युवा संगठन, नंदुरबार जिला माहेश्वरी महिला मंडल, माहेश्वरी महिला प्रगती मंडळ, माहेश्वरी महिला पंच मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांसह आदींनी परिश्रम घेतले.








