नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळवुन स्वतंत्र ग्रामपंचायत करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत हाच पर्याय असून खालील तांड्यांना महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायती होणेबाबत आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करुन सहकार्य करावे.नंदुरबार तालुक्यातील अक्राळे, चौपाळे, चाकळे, नळवे खु., सुंदरदेपाडा बंद्रीझिरा, गुजरजांभोलीपाडा बंद्रीझिरा, राजापुर, उमर्दे बु., पाचोराबारी, नारायणपुरपाडा पापनेर, सुंदरदे, सोनगिरपाडा, नागसर, नांदरखेडा, गंगापुर, टोकरतलाव, कोठडा, कोठली खु., देवपुर.तर शहादा तालुक्यातील जावदा त ह., मंदाणे, भोरटेक – चिखली, उजळोद, जयनगर, निंभोरा, उभदगड, दुधखेडा, कुसुमवाडा, चिरखान. कानडी त. ह.,तळोदा तालुक्यातील सिलिंगपुर,अक्कलकुवा तालुक्यातील आमलीफळी. नवापूर तालुक्यातील खैरवे, खांडबारा तांडावस्ती.असून वरिल ग्रामपंचायतीच्या सर्व तांड्यांना मतदार यादीमध्ये वॉर्ड निहाय वेगवेगळी नांवे दिली आहेत.
परंतु सर्व तांडे हे एकाच समुहाने एकत्रित राहत असून काही तांड्यांची लोकसंख्याही जवळपास १००० पेक्षा अधिक आहे व इतर सर्व तांड्यांची ५०० पेक्षा जास्त आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णयक्र. व्हीपीएम-२०११/प्र.क्र.१११/-४ दि. ०४ मार्च २०१४ अन्वये संदर्भिय शासन निर्णय पारित केला आहे. त्याअनुषंगाने अनेकवेळा शासन दरबारी तांडा वस्तींची माहिती मागविण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव वरील काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा
समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तांडा वस्तीला महसुली दर्जा देवून स्वतंत्र ग्रामपंचायत करणेबाबत आपल्यास्तरावरून कार्यवाही करावी असे म्हटले आहे.निवेदनावर उपजिल्हा अध्यक्ष श्रावण चव्हाण,उपसरपंच भावेश पवार, प्रेम चव्हाण प्रताप नाईक,उपसरपंच रणजीत पवा, किसन पवार, देवा चव्हाण,सुनिल पवार,पुरूषोत्तम चव्हाण,जितेंद्र राठोड अदिच्या सहया आहेत.








