Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

team by team
March 9, 2023
in सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
नंदूरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मागील वर्षी एका महत्वाच्या अभियानाची सुरुवात केली होती ती म्हणजे, पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त होय. सण / उतसव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती.
काल 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्त 19 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणारे वसंत पाटील, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, आष्टे ता. जि. नंदुरबार, गुणवंत पाटील, अध्यक्ष, छत्रपती शिवजयंती उत्सम समिती, वावद ता.जि. नंदुरबार, प्रकाश पाटील, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती, नाशिंदे ता. जि. नंदुरबार, राजेंद्र अग्रवाल, अध्यक्ष, शिवजयंती उत्सम समिती मंडळ, शहादा, उत्तम पाटील, अध्यक्ष छत्रपती शिवजयंती उत्सव समिती, मोहिदा त.श. ता. शहादा, दिपराज धनगर, अध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान गृप म्हसावद ता. शहादा यांचा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सुरु केलेल्या डी. जे. व डॉल्बीमुक्त नंदुरबार जिल्हा या अभियानास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून जिल्हाभरात होणारे सर्व सण / उत्सव हे डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपरिक वाद्यांचा वापर करून साजरे होत आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या अभियानाचे हे मोठे यश मानले जात आहे.सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, प्रमोद पवार, अति. मुख्य कार्य. अधिकारी, नंदुरबार, श्रीमती निता देसाई, बाल कल्याण समिती अध्यक्षा गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृष्णा राठोड, महिला व बाल विकास अधिकारी, डॉ. श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
सण उत्सव काळात डॉल्बी, डी.जे.चा वापर | करुन ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5000 हजार रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होवू शकते, त्यामुळे सण / उत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करु नये, तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564 210100/- 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला दिनानिमित्त पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅली

Next Post

नंदुरबारात बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव उत्साहात

Next Post
नंदुरबारात बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव उत्साहात

नंदुरबारात बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला उत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add