Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅली

team by team
March 9, 2023
in सामाजिक
0
महिला दिनानिमित्त पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅली
नंदूरबार l प्रतिनिधी
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता. सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व अमंलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला.
सदर मोटार सायकल रॅलीला सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील व डॉ. श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांनी हिरवा झेंडा दाखविला. मोटार सायकल रॅली समोर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. सदरची रॅली ही पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथुन निघून नवापुर चौफुली, साक्री नाका, सोनार खुंट, हाट दरवाजा, सिंधी कॉलनी, C. B. पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा, नेहरु पुतळा, नगर पालिका, आंधारे चौक, धुळे चौफुली, नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले.
पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे सदर रॅलीचा समारोप झाला. महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांच्या रॅलीने नंदुरबारवासीयांचे लक्ष वेधून महिला शक्तीचे प्रदर्शन केले. महिला पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी काढलेल्या मोटार सायकल रॅलीने महिलांना जणू काही एक प्रकारे सुरक्षेची हमी दिली. मोटार सायकल रॅलीतील सहभागी महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांनी बाल विवाह प्रतिबंधक उपक्रमाचे फलक हाती घेवून जनजागृती केली.
 सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना रॅलीच्या मार्गावर उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते.
 सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार ह्या हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add