नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे श्रॉफ हायस्कूलचे शिक्षक हेमंत पाटील तसेच क्रीडाशिक्षक गोपाल चव्हाण या दोघांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वृंदावन कॉलनीतील वृंदावनचा राजा गणेश मंडळात रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रॉफ हायस्कूलचे शिक्षक हेमंत पाटील तसेच क्रीडाशिक्षक, गुणवंत खेळाडू गोपाल चव्हाण या दोघांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र ,शाल, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या साक्षीने या दोन्ही शिक्षक बांधवांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून रामभाऊ पाटील स्मृति प्रतिष्ठान मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे प्रतिष्ठान मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण पाटील ,उषाबाई पाटील ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, बी. के. पाटील, प्राचार्य डी. एस.पाटील, पुरुषोत्तम पाटील , अभियंता भाऊसाहेब,मोहन पाटील, वाघ,रमेश पाटील,संजय शिंदे, अजित जैन, प्रशांत पाटील, अविनाश पाटील, जयराम राजस्थानी महाराज, पी.एम .पाटील, अनिल पाटील, डॉ प्रसाद पाटील, ऋतिक चव्हाण यांच्यासह कॉलनीतील सदस्य उपस्थित होते. यावेळी महाआरती करून, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.