नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील सुमारे ७० पदाधिकाऱ्यांसह १५० कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो. सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे तालूका प्रमुख रविंद्र गिरासे व त्यांच्या विविध ग्रामपंचायतीचे आजी- माजी सदस्य, शनिमांडळ गटाचे जि.प.चे माजी सदस्य प्रविण (मुन्ना) पाटील, त्यांच्या गटातील विविध पदांवरील पदाधिकारी तसेच ,होळचे सरपंच व्यंकट पाटील, शनिमांडळचे सरपंच योगेश मोरे, व्हा. चेअरमन वसंत देवराम पाटील, येथील विकासो. चेअरमन शशिकांत गोसावी, हाटमोहिदा सरपंच गौरव राजपूत आदी १५० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
खा.डॉ. हिना गावित,विजय चौधरी,डॉ. शशिकांत वाणी आदी व्यासपिठावर उपस्थित होते. नंदूरबार तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.








