Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे निघाली राजेशाही भोंगऱ्या आकर्षक मिरवणूक , सातपुड्यात घुमू लागले ढोल-बिरीचे सूर

team by team
March 7, 2023
in राज्य
0
धडगाव येथे निघाली राजेशाही भोंगऱ्या आकर्षक मिरवणूक , सातपुड्यात घुमू लागले ढोल-बिरीचे सूर
मोलगी । प्रतिनिधी
१८६७ पासुन परंपरा असलेल्या धडगाव शहारात सोमवारी आठवडे बाजारानिर्मित्त भोंग-या बाजार भरवण्यात आला होता. बाजारासाठी दुर्गम भागातून हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावत सांस्कृतिक पथसंचलनात सहभागी होऊन आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या घरापासून सुरु झालेल्या सांस्कृतिक शोभायात्रेचा दुपारी समारोप करण्यात आला .ढोल, मांदल,ढोलकी,पेपा-या, तुतळ्या आणि बासुरीच्या सुरांमुळे धडगाव परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. विविध वाद्यातील घेरनृत्य करत रंगत आणली होती. भोंगा-या बाजारातून दिवसभरात पूजा साहित्य तसेच विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली. थाटात निघाली शोभायात्रा.
पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या घरापासून सकाळी ११.वाजेपासून मानाच्या भोंग-या मिरवणुकील प्रारंभ करण्यात आला. पराडके कुटुंबातील पाचव्या पिढीचे पोलीस पाटील प्रतिनिधी असलेले भिमसिंग पराडके यांचे खापर पणजोबा मोल्या पराडके यांनी १८६७ मध्ये पहिल्यांदा धडगावात भोंग-या बाजार भरवल्याची माहिती आहे. त्यांच्या नंतर साठ्या पराडके, परबा पराडके, भामटा पराडके यांनी ही परंपरा ठेवली होती. पराडके कुटुंबाचा हा वारसा पोलीस पाटील भिमसिंग पराडके हे २९.वर्षा पासून अधिक काळापासून चालवत आहेत. सोमवारी त्याच्या घरी  आदिवासींच्या विविध पारंपरिक ठेवणीच्या शस्त्रांचे पूजन करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला होता. यात शेकडोंच्या संख्येने आदिवासी बाधंव सहभागी झाले.
शहरातील विविध मार्गांवर उत्साह 
भोंग-या बाजाराचे मानकरी पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या नेतृत्वात सुरुवात झालेली शोभायात्रा जुने धडगाव मार्गाने विश्रामगृह, हनुमान मंदिर मार्गाने धडगाव पोलीस स्टेशन,रुपसिंग तडवी यांचे निवासस्थान, फाॅरेस्ट कार्यालय ,पाटीलबाबा चौक या मार्गाने मेन रोडवरील मुख्य बाजारपेठेततून पुन्हा  विश्रामगृहहाकडे व पोलीस पाटील यांच्या घराकडे परतली. या मिरवणुकीत पारंपरिक वांद्याच्या तालावर आदिवासी बांधवांनी नृत्य केले. भोंग-या बाजारात पारंपरिक पोशाखतील महिला, युवती, युवक, पुरुष आणि ज्येष्ठ सहभागी झाले होते. सकाळी ११.वाजेपासून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीचा समारोप दुपारी तीन वाजता पोलीस पाटील भिमसिंग पराडके निवासस्थानी करण्यात आला.
शोभायात्रेत माजी सभापती जामसिंग पराडके,, सभापती गणेश पराडके , महेश पराडके विजयसिंग पराडके, रवि पराडके,आमदार आमशादादा पाडवी ,पिंटू वळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी झाले होते. सकाळपासून बाजारपेठेत गूळ, दाळ्या,संत्रा,हारकंगण,होळी पूजनासाठी लागणारे साहित्य, खोबरे, शोभेचा कागद आणि कपडे खरेदी साठी शेकडो आदिवासी बांधव दुर्गम भागातून धडगाव येथे आले होते. बाजारपेठेत स्थानिक व्यापा-यांसोबतच शहादा आणि अक्कलकुवा येथूनही फळ व्यापारी सहभागी झाले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धडगावच्या भोंग-या बाजारात मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. यातुन दिवसभरात हजारोंची उलाढाल झाली.
दागिन्यांची खरेदी वाढली 
होळीच्या पाश्वभूमीवर धडगाव आणि तळोदा सराफ  व्यावसायिकांकडे चांदीचे घडीव दागिने बनवून घेण्यासाठी आदिवासी महिला गर्दी करु लागल्या आहेत. सोमवारी धडगावच्या भोंग-या बाजारात चांदीचे दागिने खरेदी -विक्रीतून किमान पाच लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आले आहे. येथील महिलांकडून तळोदा येथील व्यावसायिकांना दागिन्यांची ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे.
ढोलाची थापही न्यारी
दांडी पौर्णिममेनंतर महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या होळीपर्यत आदिवासी बांधव होळीव्यतिरिक्त इतर कोणतेही खकार्यक्रम करत नाहीत.यादरम्यान होणारा भोंग-या अर्थात मेला सर्वाधिक पसंतीचा असतो. या मेल्यात ढोल वादनाची स्पर्धा घेतली जाते. धडगाव येतील मानसिंग स्टेडियम (आमराई) येथे सोमवारी भोंग-या दरम्यान ढोल स्पर्धा सुरू होती. यात ४०.च्या जवळपास ढोल वादक सहभागी झाले होते. त्याच्याकढून विविध प्रकारे सजवलेले ढोल बांधलेल्या चालींवर वाजवले जात होते. या वादनाची पाहणी करणारे पाच ते सात तज्ञ ढोल वादकांमध्ये फिरत होते. विजेत्या स्पर्घकाला गावोगावी होणार्‍या होळीमध्ये ढोल वादनाचा प्रथम मान हे बक्षीस देण्याची परंपरा असल्याने तज्ञ परीक्षक बारकाईने ढोलवर पडणा-या प्रत्येक थापंचे श्रवण करत होते. रंगतदार अशा या स्पर्धेचा उशिरापर्यंत विजेता ठरलेल्या नव्हता. १२.तासांपेक्षा अधिक काळ ढोल वादन सुरु होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त उद्या नारीशक्ती निर्धार मेळावा

Next Post

रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post
रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add