नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यासह नवापूर ,विसरवाडी खांडबारा परिसरात अवकाळी पाऊस तुफानी वारा आणि विजेचा कडकडाटाने अवघ्या तालुक्या ऐन होळी च्या दिवशी बाजार पेठेत व शहरात नागरिकांची धावपळ बघायला मिळाली आहे. दरम्यान साक्री तालुक्यातील खोरी, टीटाणे येथे गारा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रचंड तुफानी वारा आणि विजेचा कडकडाट आणि पावसाने नागरिक व्यापारी सैरा वैरा होऊन आपली दुकाने व साहित्य वाचवण्याची धडपड करताना दिसत होते.

आदिवासी बांधव होळी निमित्ताने बाजारात खरेदी साठी मोठ्या प्रमाणात येत असतात त्याच धर्तीवर येथील लहान मोठे व्यापारी आपली दुकाने थाटून बसलेले असतात आज झालेल्या अवकाळी वारा आणि पावसाने प्रचंड नुकसान केले असू न बाजार पेठेत लावलेल्या दुकानदारांची साहित्य उचलायची एकच धावपळ उडाली होती तर अनेक व्यापाऱ्यांनी ऊना च्या तडाख्या पासून वाचण्या साठी लावलेले शेड अक्षरशा हवेत उडून गेले होते.
वर्ष भर येथील व्यापारी होळी ची वाट बघत असतात होळी बाजाराच्या निमित्ताने मोठ्या खरेदी होत असते त्या आशेवर अनेक व्यापारी आपल्या संपूर्ण परिवारा सह व्यवसाय करतांना दिसतात आजच्या ह्या अवकाळी तुफानी वाऱ्या आणि पावसाने आर्थिक नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नंदूरबार शहरात मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण झाले होते.तुरळक पाऊस कोसळला.दरम्यान आज दुपारी तीन वाजेदरम्यान साक्री तालुक्यातील खोरी, टीटाणे येथे गारा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.








