Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षणातील भाषेची महती सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा विद्यार्थ्यांशी बोली भाषेतून संवाद

team by team
March 6, 2023
in राजकीय
0
शिक्षणातील भाषेची महती सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा विद्यार्थ्यांशी बोली भाषेतून संवाद

नंदुरबार

भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. ही बोली भाषा जेव्हा शिक्षणाचं आणि संवादाचं सशक्त माध्यम होतं तेव्हा किती परिणाम साधू शकतो याची प्रचिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोली भाषेतून संवाद साधला तेव्हा आली. पालकमंत्री यांनी बोली भाषेतील या संवादाने उपस्थित, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांची मने जिंकून घेतली.

निमित्त होते नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कोठली आश्रमशाळेच्या मुलींच्या सर्व सोयींनी युक्त अशा भव्य वसतिगृहांच्या ४ इमारतींच्या उद्घाटनाचे.

आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं नंदुरबार तालुक्यातील कोठली इथं उभारण्यात आलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या चार इमारतींचं लोकार्पण आदिवासी विकास मंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शरद गावित,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक ,प्रकाश गावीत जि.प.सदस्य राजेश्रीताई गावित नटावद गावाच्या सरपंच जयश्रीताई गावित सर्व गावाचे सरपंच उपस्थित होते. व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित यावेळी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण सोपं व्हावं, यासाठी राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आवर्जून सांगिताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या आदिवासी मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त चार भव्य इमारती असलेली ही राज्यातील पहिली आय. एस. ओ. नामांकित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत ५३३ मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेत नंदुरबार जिल्ह्यातल्या सात गावातल्या पाणीपुरवठा योजनांचं भूमिपूजनही डॉ. गावित यांनी यावेळी केलं. नटावद धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी १८ कोटींहून अधिक रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हर घर नल योजने अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुध्द पाणी पोहोचवलं जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनीही मनोगत व्यक्त केले.

यांचे झाले भूमिपूजन, पायाभरणी व उद्घाटन
यावेळी उमर्दे,वेळावद ,लोय मोठे पिंपळेद,रतनपाडा, बर्डिपाडा,कोठली,धानोरा येथील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन, वाघाळा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ व कोठली येथील मुलींच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

सुलतानपूर येथे नागेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार 

Next Post

लक्कडकोट येथे गुजरात राज्यात जाणारी अवैध दारूसह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
लक्कडकोट येथे गुजरात राज्यात जाणारी अवैध दारूसह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त

लक्कडकोट येथे गुजरात राज्यात जाणारी अवैध दारूसह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add