म्हसावद. l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशान्वये महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीसाठी एक तास हा उपक्रम महाराष्ट्रभर सुरू असून नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहादा शहर यांनी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या सूचनेनुसार शहादा शहरातील प्रभाग क्रमांक दहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात वाढतील समस्या दरवाढ इंधन वाढ रेशन संदर्भातील समस्या तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर ती चर्चा करण्यात आली.यावेळी शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांनी विविध विषयांवर ती नागरिकांना मार्गदर्शन केले व चर्चा करून समस्या जाणून घेऊन लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल आणि समस्या सोडवण्यात येतील असे यावेळेस नागरिकांना आश्वासित केले. याप्रसंगी सुपा सोनवणे, गोटू मराठे, धीरज मराठे,श्री. लोहार , युवराज पानपाटील व महिला प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.








