म्हआवद l प्रतिनिधी
इंडीयन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय कराटे स्पर्धेचे आयोजन मिशन हायस्कूल येथे करण्यात आले होते.
विभाग स्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन हिरा उद्योग समूहाचे युवा नेते संकेत प्रविण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव गणेश मराठे, अध्यक्ष संतोष मराठे,योगेश माळी, प्रमोद बैसाने कल्पित नाईक, भुषण तडवी , विवेक पलिकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत जवळपास 225 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला 8 वर्ष वयोगटातील अनिकेत पवार व रुजल गुरव ने सुवर्ण तर प्रभू मराठे ला रौप्य पदक 11 वर्षा आतील रेवा पवार, खुशी पाटील व प्रतीक पलिकर ह्या तीन खेळाडूंनी देखील सुवर्ण पदक मिळविले.तर मोठ्या गटातील अंतिम फेरीत जतिन हरिष खसावद चॅम्पियन ठरला.
स्पर्धेमध्ये काता आणि कुमिती असे दोन मुख्य प्रकार होते.कराटे खेळाचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी स्पर्धा वय वर्ष 5 ते 19 वर्षा आतील घेण्यात आल्या.स्पर्धेचे पंच पवन बिऱ्हाडे,अमित पाडवी,ओम गोसावी, नरेंद्र बिऱ्हाडे , साई पानपाटील आदी.टेबल रेफ्री याकूब मोहम्मद,लीना पंडित, रिग्णेश गुलाले,साक्षी जगदाळे यांनी काम पाहिले.टाईम किपर व कॉर्नर रेफ्री म्हणुन विशाल सोनवणे ,रोहित हराळे, भूमी मराठे आदी. सदर स्पर्धेचे निरिक्षण जिल्हा कराटे असोसिएशन चे उपाध्यक्ष नरेंद्र माळी यांनी केले.स्पर्धेचे सुत्र संचालन गणेश मराठे तर आभार निता मराठे यांनी मानले.








