नंदुरबार l प्रतिनिधी
खुंटामोडी येथे काल ४ मार्च रोजी होळी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या होळी मध्ये सातपुड्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिकांनी या होळी सणाच्या आनंद घेतला. तसेच याठिकाणी वेगवेगळ्या वस्तू विकणारे व लहान मुलांची खेळणी व इतर दुकानदार या ठिकाणी होते.
ही होळी नंदुरबार जिल्ह्यातील खुंटामोडी येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जात असते. त्यामुळे लोकांची गर्दी या ठिकाणी खूप असते.आणि वेगवेगळ्या गावातील नागरिक व (मोरखी ) यांचे मानता असल्यामुळे होळीच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात.
आदिवासी समाजात होळी सण हा खूप महत्वाचा समजला जातो. त्यामुळे भावीक दर्शन घेण्यासाठी दूर दूर हुन लोक येत असतात. ही होळी पहाटे ५,६, वाजता होळीची पूजा करून होळी माताला सजवून तिची पुंजा विधी करून पेटविण्यात आली.
दि.५ मार्चला दिवसाला मेलादा भरत असतो.या होळी मध्ये सातपुडा भागातील आदिवासी नागरिक याठिकाणी होळी पाहण्यासाठी उपस्थित होते.








