तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील रोझवा पुनर्वसन ,रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन सह वसाहतींमध्ये होलिकोत्सवाला प्रारंभ झाला असून त्यामुळे वातावरणात उत्साह असल्याचे चित्र आहे .
आदिवासी बांधवांच्या होळी हा सण आदिम सांस्कृतिक सण म्हणजे आदिवासींच्या कुलदेवतांपैकी एक आदिम देवता अर्थात होळी जागण माता होय.त्यामुळे होळी मातेला विशेष महत्त्व असून परिसरात होळी सण उत्साहात साजरा करण्यात येत असतो. होळीमातेच्या नवस करणाऱ्यांकडून कडक नियमांचे पालन करण्यात येत असते .यालाच मानता असे म्हणतात .ती फेडण्यासाठी कुटुंबातील पुरुष हा गाव पुजारी यांच्या सांगण्यावरून मोरखी ,बावा, बुद्या, नागरा मोरखी ,धानका डोकी अशा वेशभूषा घेऊन होळीत आपला नवस फेडतात. त्यांच्याकडून नियमाचे पालन करण्यात येऊन घराबाहेर राहून ,गुरे, घरातील माणसे ,धान्य यांचे निगा राखण्यात येते व होळीमातेला आपल्या कुटुंबासह गावाच्या कल्याण, रोगराई ,नैसर्गिक संकटातून सुटका यासाठी साकडे घालण्यात येते.
दरम्यान तालुक्यातील पुनर्वसन वसाहतींमध्ये मुळगाव असलेल्या बाधितांकडून आपली होळी वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असते .रोझवा पुनर्वसन येथील मुळगाव शेलदा गावाच्या होळीस सुरुवात झाली असून त्यानंतर डोमखेडी ,जुनवणे, सिक्का, भरड गावांची होळी साजरीहोणार आहे .
रेवानगर पूर्वसन येथे परंपरागत दि 6 रोजी राजवाडी होळीनिमित्त बक्षिस देण्यात येणार आहे यात गळ्यातील ढोल प्रथम ११०५१रू द्वितीय ५०५१रु तृतीय ३०५१रु,बाबा बुद्या प्रथम ५०५१रु, द्वितीय ३०५१रू, तृतीय २०५१रू,होळी गायन प्रथम ११५१रू, द्वितीय ५११, तृतीय २५१,खुर्ची ढोल प्रथम ७५५१रू द्वितीय ३५५१रू, तृतीय २५५१रु, गेऱ्या प्रथम ४०५१, द्वितीय २०५१, तृतीय १५५१रू,बासुरी वादन प्रथम ११५१रू, द्वितीय ५५१रू, तृतीय २५१ रू यासाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन होळी उत्सव समिती व सर्व ग्रामस्थ या रेवानगर (साद्री )यांच्याकडून करण्यात आले आहे .
जीवननगर पुनर्वसन येथे दि सहा रोजी होळी साजरा होणार असून गळ्यातील ढोल, खुर्चीवाले ढोल ,बाबा बुद्या, गेरनृत्य, यांच्यासाठी बक्षीस ठेवण्यात आले आहेत .
तालुक्यातील हाडंबा दि 7 रोजी होळी साजरा करण्यात येणार असून ढोल बक्षीस ,बासरी वादन बोरख्या बुध्या, बावा ग्रुप यांच्यासाठी बक्षिसे ठेवण्यात आली असून त्यासाठी माजी सभापती यशवंत ठाकरे यांच्याकडून ढोल बक्षीस देण्यात आले असून लकडकोट जि प मुख्याध्यापक अमरसिंग ठाकरे यांच्याकडून मोरख्या प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान होलिकोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.








