नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील बेडकी (पाटी), धनराट, कोळदा येथील राष्ट्रवादी कॉग्रेस व अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सदर कार्यक्रम हा सिनियर कॉलेज येथे नवापूर तालुक्याचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष दिलीप नाईक, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दामू बिर्हाडे, सरपंच नवलसिंग गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत आदी उपस्थित होते. यावेळी बेडकी (पाटी) येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जयवंत गावीत ग्रा.पं.सदस्य रामदास गावीत, ग्रा.पं.ज., फिलीप गावीत, वासु गावीत, मनेश गावीत, रमेश गावीत, मगन गावीत, गणपत गावीत, तसेच धनराट येथील राष्ट्रवादी कॉग्रेस ग्रा.म.स.,संदिप गावीत, विपुल गावीत, विलास गावीत, वासुदेव गावीत, करण गावीत, प्रितम गावीत, दिमेश गावीत, प्रितम करणसिंग गावीत तसेच कोळदा येथील रमेश वसावे,जयेश वसावे, प्रमेश वसावे, जालमसिंग गावीत, दिनेश वसावे, वासु गावीत सह असंख्य कार्यकर्त्यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक, जालमसिंग गावीत, दामू बिर्हाडे, नवलसिंग गावीत, तानाजी वळवी, विनय गावीत, बाळु गावीत, केळी सरपंच निलेश गावीत, जगदीश पाटील यांनी कॉग्रेस पक्षाचे मफलर व फुलगुच्छ देऊन कॉग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष दिलीप नाईक म्हणाले की आ.शिरीषकुमार नाईक यांच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून तरुण कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विकास कार्य पद्धतीवर विश्वास ठेवला आहे. ही सुरुवात आहे यानंतर मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील, असेही ते म्हणाले.