नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार स्टेशनचे प्रवेशद्वारा समोर कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येत असल्याने रेल्वे स्टेशनप्रवेशाद्वारा समोरील मार्ग दि. १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे कळवील आहे.
या पत्रात म्हटले आहे की, नंदुरबार स्टेशनचे प्रवेशद्वारा समोर कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येत असल्याने रेल्वे स्टेशन प्रवेशाद्वारा समोरील मार्ग दि. १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. स्टेशनवर जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून रायनाल नगर, कंजरवाडा इकडील प्रवेशद्वाराचा मार्ग सुरू असल्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रस्तावित रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वारा समोरील मार्ग दि. १६ ते १९ सप्टेंबरपर्यंत रहदारीस बंद ठेवण्यात येवून रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी रायनाल नगर, कंजरवाडा प्रवेशद्वाराकडील मार्ग या मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे कळवील आहे.