मोलगी । प्रतिनिधी
तिनसमाळ हद्दीत असलेल्या सातपुडा डोंगर रांगेत लिमगव्हाण परिसरात डोंगराला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली असून, डोंगर जाळणार्याचा कोणीतरी शोध घ्या, असे चित्र बघावयास मिळत आहे.
धुराचे लोळ दिसत असल्याने गावकरी घटनास्थळी धाव घेतली तेथे जाउन पहिले असता शेकडो हेक्टर क्षेत्र जळून डोंगर जाळून खाक झाल्याचे चित्र दिसले त्यात ,लहान-मोठ्या झाडांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. गावातील सर्व गुरांना हाच चारा दिला जात असल्याने गुरांच्या चाराचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाळा संपला असतांना पावसाळ्यामध्ये जी झाडे झुडपे मोठी होतात तिच झाडे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी अशीच डोंगराला आग लागून बरेच नुकसान होत आहे. या वर्षी याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून cct ची कामे करण्यात आली होती. साधारणत: लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहॆ.
राज्य शासन व केंद्र शासन वृक्ष लागवडीवर कोटी रुपये खर्च करून झाडे लावा, झाडे जगवा या वृक्ष संवर्धनाच्या योजना राबवत असताना ओसाड पडलेले डोंगर यामध्ये अशा रात्रीच्या वेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन आग लावत असेल तर याला आळा घालणे गरजेचे झाले आहे. यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असून वन विभाग काय पाऊल उचलते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.








