Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन

team by team
March 3, 2023
in Uncategorized
0
जिल्हा पोलीस दलाच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन

नंदुरबार |  प्रतिनिधी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील हे दोन दिवस नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी येथे आले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या  पोलीस आरोग्य व संवर्धन  या अभियानाच्या दुसर्‍या टप्याच्या वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन डॉ.बी.जी.शेखर पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य यांच्यासाठी  पोलीस आरोग्य व संवर्धन  या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार व त्यांच्या परिवारातील सदस्य यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असणार्‍यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच तपासणी दरम्यान मोतीबिंदू असणार्‍या ५ अंमलदारांचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नारी संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाममात्र शुल्क आकारून हिपॅटायटीस – ए व बी या लसींचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

 

 

आज पर्यंत जिल्हा पोलीस दलातील एकूण १ हजार २१८ पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्मित हॉस्पीटल, नंदुरबार यांच्यातर्फे मोफत रक्त तपासणी करण्यात आली होती. मोफत रक्त तपासणी केल्यानंतर ज्या अधिकारी व अंमलदार यांना ह्दयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठ, कंबर आणि मणकेदुखी तसेच रक्तासंबंधी आजार  निष्पन्न झाले आहे. त्यांच्या सखोल वैद्यकीय तपासणी शिबीराची सुरुवात आज पासून करण्यात आली. पोलीस आरोग्य व संवर्धन  या अभियानांतर्गत अधिकारी,अंमलदार यांची पूर्ण शारीरिक तपासणी होवून प्रत्येकाची वैयक्तीक आरोग्य विषयक माहिती संकलीत करून प्रत्येक पोलीस अधिकारी / अंमलदार यांची एक फाईल पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे व त्या आधारे प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदार यांची शारीरिक, मानसिक क्षमता निश्चित करून त्यानुसार भविष्यात कामकाजाचे मुल्यमापन व नियोजन करण्याचा मानस असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले. या अभियानात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला मदत करणार्‍या स्मित हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय पटेल, डॉ. तेजल चौधरी, डॉ. शब्बीर मेमन, व्यवस्थापक डॉ. भरत पटेल तसेच तेथील कार्यरत डॉ. रोहित पटेल व डॉ. कल्पेश चौधरी यांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

 

 

 

या प्रसंगी डॉ. विजय पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ३०टक्क्या पेक्षा अधिक पोलीसांना आरोग्याच्या समस्या असून पोलीसांना किरकोळ त्रास जाणविल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यकीय उपचार केल्यास पुढील आरोग्यविषयक गुंतागुंत टाळता येवू शकते असे त्यांनी सांगितले. पोलीस दलाचे कामकाज हे आव्हानात्मक असून दैनंदिन कामकाज करतांना पोलीसांवर वेगवेगळ्या प्रकारे तणाव येत असतो. त्या शारीरिक व मानसिक तणावातून मार्ग काढून सकस आहार व योग्य व्यायाम याद्वारे आपण व्याधींपासून दूर राहू शकतो. स्मित हॉस्पीटलने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वैद्यकीय तपासणी बरोबर योग्य आहार कसा असावा ? याबाबत कार्यशाळा घ्यावी असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.  बी. जी. शेखर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

 

 

मागील काही वर्षापासून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचेसाठी तातडीने व चांगल्या उपचारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाशी करार नसल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उपचारासाठी शेजारच्या धुळे अथवा इतर जिल्ह्यात जावे लागत होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अधिकारी व अंमलदार यांची अडचण लक्षात घेवून नंदुरबार शहरातील स्मीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलसोबत महात्मा फुले कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा करार करुन जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांची आरोग्य विषयक महत्वाची अडचण पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी दुर केली. अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या बाबतीत सजगतेने काम करीत असल्याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे कौतूक केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्ह्याचे विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

विषेश कामगीरी करणार्‍या जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान

Next Post

भाजपाने दिली आगाराला संभाजीनगर नावाची पाटी

Next Post
भाजपाने दिली आगाराला संभाजीनगर नावाची पाटी

भाजपाने दिली आगाराला संभाजीनगर नावाची पाटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add